Saturday 2 April 2011

काशी

काशी- कांची हे शिवतीर्थ आणि विष्णुतीर्थहि आहे. येथील स्टेशनाचे नाव कांजीवरम असले तरी या शहराचे नाव कांचीपुरम आहे. मद्रासपासून सुमारे १२ कि. मी. वर हे शहर आहे. शिवकांची व विष्णुकांची असे या नगरीचे दोन भाग आहेत.
 
        अयोध्या, मथुरा, द्वारका, हरिद्वार, काशी, उज्जैन आणि 'कांची' या मोक्ष देणाऱ्या सप्तपुर्या     आहेत. येथे सतीचे नख गळून पडले म्हणून या क्षेत्राला शक्तीपीठहि मानतात.  
             
 
 
 
                  नेत्रद्वय महेशस्य काशीकांचीपुरीद्व्यम !
         म्हणजे काशी आणि कांची हे शिवाचे नेत्र आहेत, असे ब्रम्हांडपुराणात म्हटले आहे.   
 
         येथील एकम्बरनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या महाद्वारावरील गोपूर ५८ मीटर उंच आहे आणि येथील सभामंडपाला एक हजार खांब आहेत. येथील शिवलिंग पृथ्वी-तत्वरूप मानतात. शिवकांचीमधील कामाक्षीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. गावात शंकराचार्यांचेहि मंदिर आहे.
 
 
 
 
 
         विष्णुकांचीला वरदराजाचे मंदिर प्रसिद्ध आहे. या कांचीमध्ये १८ विष्णूस्थळे, १०८ शिवस्थळे आणि-१ गणेशस्थळे आहेत. येथील कैलासाचे मंदिर इ. स. ६७४ मध्ये पल्लवराजांनी बांधलेले आहे. 
 
         येथील पिप्पलैथम हे प्राचीन जैन मंदिरही प्रसिद्ध आहे. हि पल्लवांची राजधानी होती. दक्षिणेतील प्रत्येक संत, तसेच पंडित, साहित्यिक यांनी या ठिकाणी वास्तव्य केले.  त्यामुळे हि विद्वानांची नगरी म्हणून मानण्यात येते. बौद्ध व जैन मुनींनीही येथे वास्तव्य केले. येथे विद्यापीठ होते.
 
         सर्वतीर्थ, शिवगंगा, पुष्करिणी, कोटीतीर्थ वगैरे अनेक सरोवर येथे आहे.
 
 
 
 

No comments:

Post a Comment