Saturday 2 April 2011

कन्याकुमारी


कन्याकुमारी- भारताच्या दक्षिणेकडील तीर्थस्थान. पश्चिमसागर, दक्षिणसागर, व बंगालचा उपसागर या  तीनही सागराचा संगम येथे आहे. एकावेळी सूर्यास्त व चंद्रोदय पहावयाचे ठिकाण. ५१ शक्तीपीठापैकी हे देवीचे विशाल मंदिर आहे. 




              त्रिवेणी सागरसंगम स्थानाचे महात्म्य येथे आहे. येथून पुढे समुद्रात विवेकानंद स्मारक आहे. तेथे तीन दिवस विवेकानंदांनी तप केले होते. तेथे त्यांना दिव्या साक्षात्कार झाला होता. तेव्हा देवीचे दर्शन स्वामीजींना झाले होते. त्याचे चरणचिन्ह आजही तेथे आहे. येथे विवेकानंद मंडप,  ध्यानमंडप, श्रीपाद मंडप अशी स्थाने आहेत. कन्याकुमारीहून जवळच शुचीन्द्रम  म्हणून स्थान आहे. 




              शुचीन्द्रम येथे शंकर कन्याकुमारीशी विवाह करण्याकरिता आले होते. ते हे स्थान. येथे शिवलिंग रूपातील त्रिमूर्ती असून त्यावर नागफण्यांची छत्री आहे. त्यामध्ये चंद्राचा सोळा कळा  दाखविल्या जातात. येथेही स्तंभावर स्वर उमटतात. हे स्वर तंबोरा, सतार, जलतरंगचे  आहेत.  



              येथून पुढे नागर कोइल येथे नागेश्वराचे मंदिर आहे. तीरुविहार येथे शेषशायी भगवंताची  मूर्ती आहे. त्यानंतर पपनाराम येथे नीलकंठ, नियातेकरा येथे श्रीकृष्ण, कुमारकोइल येथे कार्तिक स्वामी यांची मंदिरे आहेत. जवळच त्रिवेंद्रम शहर आहे. तेथे पद्मनाभ भगवंताचे मंदिर असून मुळचे नाव तिरुअनन्तपुरम असे आहे. तेथे मत्स्यतीर्थ, कोलत्तूर, व जनार्दन हि तीर्थस्थाने आहेत.


No comments:

Post a Comment