Wednesday 27 April 2011

अयोध्या

अयोध्या-भारतीयांच्या जीवनात 'राम' या नावाला किंवा शब्दाला अनन्यसाधारण महत्वाचे स्थान आहे. त्या श्रीरामाचे जन्मग्राम म्हणजे अयोध्या. उत्तरेतील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र. हि पुराणकालीन सात पुर्यांमधील हि एक नगरी आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी आपले रामायण येथे लिहले. विनिता, अयुधा, साकेत, इक्ष्वाकुंची ही भूमी म्हणून इक्ष्वाकुभूमी, रामभूमी अशी काही नावे या नगरीला आहेत.




           शरयू नदी ही येथील तीर्थ. तिच्या तीरावर ऋणमोचन, सहस्त्रधारा, लक्ष्मन, स्वर्गद्वार, गंगामहाल, शिवाला, जटायू, अहल्याबाई, जानकी, राम वगैरे अनेक घात आहेत. हनुमानगड, कनकभवन, दर्शनेश्वर, जन्मस्थान, तुलसी चौथरा, मनिपर्वत, द्तुन्कुंड, सोनखर, सूर्यकुंड, गुप्तारघात, जनकौरा भरताचे आजोळ नंदीग्राम, दशरथतीर्थ, चपैया वगैरे स्थळे या परिसरात आहेत.

           येथील मणिपर्वतावर राजा अशोकाने बौद्ध स्तंभ व स्तूप बांधला. गौतम बुद्ध स्वतः या नगरीत राहत असत.

           जैन तीर्थकर ऋषभदेव यांची ही जन्मभूमी. या परिसरात पाच जैन मंदिरे आहेत. या प्रदेशामध्ये जमदग्नी कुंड, बलरामपुर, देवीपाटन, पिपरावा, कपिलवस्तू, मगहर, कुशीनगर श्रावस्ती आणि गोरखनाथांचे मुख्य तपस्चर्या स्थळ, गोरखपूर ही क्षेत्रे आहेत. गोरखनाथ, श्रीविष्णू, श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीशंकर वगैरे देवतांची येथे मंदिरे आहेत. 



  

No comments:

Post a Comment