Tuesday 26 April 2011

त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर- त्र्यंबकेश्वर हा एकटा नसून तो तेथे ब्रम्हदेव व श्रीविष्णू यांच्या समवेत आहे. या पिंडीवर लहानशी चीर असून तिच्यातून सतत जल पाझरत असते. ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी हे शिवालय आहे.

             श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराभोवती भव्य चिरेबंदी तट आहे. मंदिराची बांधणी श्रीयांत्राकार आहे.





             ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरीचा उगम झाला. पण ती नंतर भूगर्भातून वाहू लागून खाली  त्र्यंबकेश्वरापाशी प्रगट झाली. गौतम ऋषींनी आपल्या कुशाचा बांध घालून तिला अडवून धरले, ते येथील कुशावर्त तीर्थ.

             ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी नाथ पंथातील मंडळींचा प्राचीन त्र्यंबकमाठ आहे. दर बारा वर्षांनी तेथे कुंभ मेळा भरतो. त्यावेळी हिंदुस्थानातून नागपन्थांच्या बाराही शाखांचे जोगी इथे येत असतात.





             गंगाद्वार-कनखल-अहल्यासंगम-गौतमालय-चक्रतीर्थ वगैरे तीर्थे येथे असून गायत्री-इंदेश्वर-रामेश्वर वगैरे देवतांची मंदिरे आहेत.

             महाराष्ट्रातील मोठे संत ज्ञानदेव यांचे थोरले बंधू आणि गुरु संत श्रीनिवृत्तीनाथ येथे शके १२१६ ज्येष्ठ वद्य ११ ला समाधी घेतली. त्यांचे येथे मंदिर आहे.
           





No comments:

Post a Comment