Thursday 28 April 2011

तिरुपती-बालाजी


तिरुपती-बालाजी- हे स्थान आंध्रमधील रेनीगुंडा स्टेशनपासून जवळ आहे. तसेच मद्रासपासून रेनीगुंडा  स्टेशन १३६ कि. मी. आहे. हे स्थान शेषाचल पर्वतावर असून, या पर्वताला एकूण सात शिखरे आहेत. याला सात फण्यांचा अदिशेष समजतात. ज्या पर्वतावर व्यंक्तेशाचे मंदिर आहे त्याला वेन्क्ताचल म्हणतात. तिरू म्हणजे श्रीमान, मलै म्हणजे पर्वत किंवा श्रीपर्वत म्हणतात. दुसरा अर्थ वेंडू म्हणजे  पाप, कट म्हणजे नाशक, अर्थात पापनाशक पर्वत असे म्हणतात. तसेच गिरीचा बालाजीही म्हणतात.  हा विष्णूचा अवतार आहे. 




          या पर्वतावर कपिलतीर्थ नावाचे सरोवर आहे. कल्याण कट्टा (डोक्यावरचे केश काढण्याची  जागा), स्वामी पुष्करिणी मंदिराजवळ सरोवर आहे. वाराह मंदिर आहे. येथे  वाराहाचे प्रकटीकरण  झाले होते असे समजतात. बालाजीच्या मंदिराचा कलश संपूर्ण सुवर्णाचा असून, भारतातील  श्रीमंत  देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे श्रीराधा कृष्ण मंदिर, शिव, हनुमान, गणेश इ. देवतांची  मंदिरे  आहेत. आकाशगंगा, पापविनाश, वैकुंठ, पांडव, जांबली, गोगार्भ इ. तीर्थे आहेत. येथे  भगवंताची 'श्रीमूर्ती' हि शंख, गदा, पद्मधारी आहे. हि मूर्ती सात फुट उंचीची आहे. दोन बाजूला श्रीदेवी व  भूदेवीच्या मूर्ती आहेत. श्रीरामानुजाचार्यांचे येथे एक पीठ आहे. येथून जवळच तीरुचानुरला पद्मावती देवीचे मंदिर आहे.           










द्वारावती (द्वारका)

द्वारावती (द्वारका) - द्वारकेचे येथून नुसते दर्शन केले, तिला स्पर्श केला तरीही मनुष्याची मोठमोठ्या पापांमधून सुटका होऊन त्याला मुक्ती मिळते. स्वर्ग लोकामध्ये तो जातो, असे स्कंद पुराणात म्हटले आहे. 

               चार धामांपैकी हे एक धाम आणि सात मोक्षपुरीमधील एक असे हे  प्राचीन  क्षेत्र  सौराष्ट्रात  गोमातीच्या तीरावर आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णाची हि  नगरी म्हणून भाविकांच्या मनात हिला  अनन्यसाधारण  महत्वाचे स्थान आहे. महाभारत, वायू, स्कंद, विष्णू, भागवत वगैरे पुराणांमध्ये द्वारकेचे माहात्म्य वर्णिलेले आहे. द्वारावती, द्वारवती, द्वारमती वगैरे नावेही या क्षेत्राची आहेत.




               चतुर्वर्नांना मोक्षद्वारणी सन्ति यत्रेति-म्हणजे जिथे चारही वर्नियांची मोक्षद्वारे उघडी आहेत ती हि द्वारवती तथा द्वारका होय. 

                द्वारकेमध्ये असंख्य मंदिरे आहेत.   त्यातील  द्वारकाधीशाचे  प्रमुख   मंदिर  होय.  श्रीरामानुजांनी  सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे येथील त्याचे सर्व पूजाविधी होत असतात. बलराम, अंबादेवी, श्रीकृषणाच्या  अष्टनायिका , वृद्धेश्वर महादेव यांच्याही येथे मूर्ती आहेत.

                मोंगल आणि ब्रिटीश अमदानीत द्वारकेच्या मंदिरांच्या विध्वंस करण्यात आला होता. नंतर ते  पुन्हा बांधण्यात आले. 


               आद्य शंकराचार्यांनी हिंदुस्थानात चारी भागांत त्यांचा एक एक मठ स्थापन केला. त्यातील  शारदापीठ हे द्वारकाधीशाचे मंदिरानजीक आहे. संत ज्ञानदेव, मध्वाचार्य, रामानुजाचार्य,  वल्लभाचार्य,  नरसिंह मेहता, मीराबाई वगैरे अनेक महात्म्यांनी येथे येऊन द्वारकाधीशाचे दर्शन घेतलेले आहे. 

              गोमती नदी आणि समुद्र यांचा येथे संगम आहे. तेथे संगम नारायणाचे मंदिर आहे. निष्पाप  नावाचे येथे आणखी एक तीर्थ आहे. 







Wednesday 27 April 2011

मथुरा


मथुरा- मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी. त्यामुळे भारतीयांच्या मनात या क्षेत्राविषयी अनन्यसाधारण भक्तीभावना आहे. राजवाडा, उंची हवेल्या यामध्ये भगवंताला जन्म घेता आला असता, पण तेथे त्यांनी तो न घेता येथे तुरुंगात घेतला, आणि त्या तुरुंगभूमीचे रुपांतर झाले तीर्थक्षेत्रात.





           मधुपुरी, मधुशिका, मधुपघ्ना, मधुबन, मधुरा अशी नावेही मथुरेला आहेत. श्रीकृष्ण जन्मभूमी, तसेच त्या नजीकचे गीता मंदिर, द्वारकाधीश मंदिर, वृंदावन, गोवर्धन पर्वत, बाल ध्रुव टेकडी, कालिया नागाला नष्ट केले ते कालियहद, श्रीरंग मंदिर, गोकुळ, महावन नांदगाव, बरसाना वगैरे अनेक क्षेत्रे व घाट या परिसरातील यामुनातटकी आहेत.





           मथुरेचा हा परिसर २६८ कि. मी. चा असून मथुरेच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर ९३ तीर्थक्षेत्रे आहेत. या परिसराला ब्रजमंडळ म्हणतात. त्याशिवाय या प्रदक्षिणा मार्गास काही फाटे फुटले असून तेथे जुरहरा, रेणुका, धोलपुर, सीताकुंद, धरणीधर, वराह, देवल, देवकली, हरगाव, गोल, गोकर्ण ही क्षेत्रे आहेत.
 तसेच या प्रदेशात जैनांचीही शारीपुर, त्रिलोक्पुर, चांदपूर, कम्पिल वगैरे क्षेत्रे आहेत.

            मथुरेहून आग्ऱ्याला रेल्वे व मोटार मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आगऱ्याहून  सुटका हा प्रसंग येथीलच लाल किल्ल्यातील. जगप्रसिद्ध ताजमहाल, फत्तेपुर्सिक्री वगैरे स्थळे येथे आहेत.




































































































































































































































अयोध्या

अयोध्या-भारतीयांच्या जीवनात 'राम' या नावाला किंवा शब्दाला अनन्यसाधारण महत्वाचे स्थान आहे. त्या श्रीरामाचे जन्मग्राम म्हणजे अयोध्या. उत्तरेतील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र. हि पुराणकालीन सात पुर्यांमधील हि एक नगरी आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी आपले रामायण येथे लिहले. विनिता, अयुधा, साकेत, इक्ष्वाकुंची ही भूमी म्हणून इक्ष्वाकुभूमी, रामभूमी अशी काही नावे या नगरीला आहेत.




           शरयू नदी ही येथील तीर्थ. तिच्या तीरावर ऋणमोचन, सहस्त्रधारा, लक्ष्मन, स्वर्गद्वार, गंगामहाल, शिवाला, जटायू, अहल्याबाई, जानकी, राम वगैरे अनेक घात आहेत. हनुमानगड, कनकभवन, दर्शनेश्वर, जन्मस्थान, तुलसी चौथरा, मनिपर्वत, द्तुन्कुंड, सोनखर, सूर्यकुंड, गुप्तारघात, जनकौरा भरताचे आजोळ नंदीग्राम, दशरथतीर्थ, चपैया वगैरे स्थळे या परिसरात आहेत.

           येथील मणिपर्वतावर राजा अशोकाने बौद्ध स्तंभ व स्तूप बांधला. गौतम बुद्ध स्वतः या नगरीत राहत असत.

           जैन तीर्थकर ऋषभदेव यांची ही जन्मभूमी. या परिसरात पाच जैन मंदिरे आहेत. या प्रदेशामध्ये जमदग्नी कुंड, बलरामपुर, देवीपाटन, पिपरावा, कपिलवस्तू, मगहर, कुशीनगर श्रावस्ती आणि गोरखनाथांचे मुख्य तपस्चर्या स्थळ, गोरखपूर ही क्षेत्रे आहेत. गोरखनाथ, श्रीविष्णू, श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीशंकर वगैरे देवतांची येथे मंदिरे आहेत. 



  

Tuesday 26 April 2011

त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर- त्र्यंबकेश्वर हा एकटा नसून तो तेथे ब्रम्हदेव व श्रीविष्णू यांच्या समवेत आहे. या पिंडीवर लहानशी चीर असून तिच्यातून सतत जल पाझरत असते. ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी हे शिवालय आहे.

             श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराभोवती भव्य चिरेबंदी तट आहे. मंदिराची बांधणी श्रीयांत्राकार आहे.





             ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरीचा उगम झाला. पण ती नंतर भूगर्भातून वाहू लागून खाली  त्र्यंबकेश्वरापाशी प्रगट झाली. गौतम ऋषींनी आपल्या कुशाचा बांध घालून तिला अडवून धरले, ते येथील कुशावर्त तीर्थ.

             ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी नाथ पंथातील मंडळींचा प्राचीन त्र्यंबकमाठ आहे. दर बारा वर्षांनी तेथे कुंभ मेळा भरतो. त्यावेळी हिंदुस्थानातून नागपन्थांच्या बाराही शाखांचे जोगी इथे येत असतात.





             गंगाद्वार-कनखल-अहल्यासंगम-गौतमालय-चक्रतीर्थ वगैरे तीर्थे येथे असून गायत्री-इंदेश्वर-रामेश्वर वगैरे देवतांची मंदिरे आहेत.

             महाराष्ट्रातील मोठे संत ज्ञानदेव यांचे थोरले बंधू आणि गुरु संत श्रीनिवृत्तीनाथ येथे शके १२१६ ज्येष्ठ वद्य ११ ला समाधी घेतली. त्यांचे येथे मंदिर आहे.
           





रामेश्वर

रामेश्वर- भारतातील चारीधाम यात्रेतील हे एक धाम द्क्षिन्द्वार. बारा ज्योतीर्लीन्गातील हे एक क्षेत्र. तीर्थयात्रेचा विषय निघाला कि सहजच तोंडातून शब्द बाहेर पडतात काशी-रामेश्वर. वास्तविक काशी उत्तरेत, तर रामेश्वर दक्षिणेत. दोन्ही क्षेत्रांमध्ये शेकडो किलोमीटरचे अंतर. पण काशीची गंगा नेऊन रामेश्वराला स्नान घालायचे आणि रामेश्वर सागरातील सेतू म्हणजे वाळू काशीला नेऊन गंगार्पण करायची हि भारतीयांची प्राचीन काळपासून आजतागायत चालत आलेली पुण्या परंपरा.




         रामेश्वरामध्ये रामतीर्थ, हनुमानतीर्थ, सीतातीर्थ, लक्ष्मनतीर्थ, माधवतीर्थ, नीलतीर्थ वगैरे अठ्ठावीस तीर्थे आहेत.

         रामेश्वर मंदिराभोवती भव्य तट असून एक हजार मीटर लांब व आठशे मीटर रुंद एवढे मोठे हे मंदिर आहे. चार द्वारे त्याला आहेत. प्रत्येक द्वारावर गोपूर आहे. त्यांच्यावर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. रामेश्वराच्या पिंडीसमोर भव्य नंदी असून नजीकच सोन्याच्या पत्र्याने मढविलेला गरुडस्तंभ आहे.





         पार्वती, गणपती, नंदिकेश्वर, श्रीराम, कार्तिकस्वामी वगैरेंची येथे मंदिरे आहेत. रामनाद येथील सेतुवती या राजघराण्यातील वंशजांनी हे मंदिर बांधलेले आहे. दर शुक्रवारी येथे पार्वतीची पालखी निघत असते. बाराही महिने भाविकांची गर्दी असते.





महांकालेश्वर

महांकालेश्वर- अवतरण या मूळ संस्कृत शब्दापासून अवतार हा शब्द निर्माण झाला आहे. अव म्हणजे खाली व तृ म्हणजे उतरणे. शिवाने महान्कालाचा आणि पार्वतीने हरसिद्धीचा अवतार घेतला, ती गोष्ट घडली, ती हि अवतार कथा.





        त्रिपुरासुर मजला होता. ऋषीमुनींना तो त्रास देत होता. त्याचा वध शिवशंकरांनी केला. याचाच अर्थ त्रिपुरासुरावर विजय मिळविला. म्हणून या ठिकाणाचे नाव पडले उज्जयिनी. मध्यप्रदेशात हे क्षेत्र असून बारा ज्योतीर्लीन्गांतील एक आहे. त्याला महांकाल किंवा महांकालेश्वर म्हणतात.



 

        उज्जयीनीचे दुसरे नाव अवंती आहे. अयोध्या-मथुरा येथे सप्त पुर्यांमध्ये अवंती हि नगरी पण आहे.

        देवीच्या एक्कावन्न शक्तिपीठांपैकी हे एक आहे. इथे सतीचा कोपर गळून पडला म्हणून इथे देवीच्या मूर्तीऐवजी कोपराची पूजा करतात.