Thursday 28 April 2011

तिरुपती-बालाजी


तिरुपती-बालाजी- हे स्थान आंध्रमधील रेनीगुंडा स्टेशनपासून जवळ आहे. तसेच मद्रासपासून रेनीगुंडा  स्टेशन १३६ कि. मी. आहे. हे स्थान शेषाचल पर्वतावर असून, या पर्वताला एकूण सात शिखरे आहेत. याला सात फण्यांचा अदिशेष समजतात. ज्या पर्वतावर व्यंक्तेशाचे मंदिर आहे त्याला वेन्क्ताचल म्हणतात. तिरू म्हणजे श्रीमान, मलै म्हणजे पर्वत किंवा श्रीपर्वत म्हणतात. दुसरा अर्थ वेंडू म्हणजे  पाप, कट म्हणजे नाशक, अर्थात पापनाशक पर्वत असे म्हणतात. तसेच गिरीचा बालाजीही म्हणतात.  हा विष्णूचा अवतार आहे. 




          या पर्वतावर कपिलतीर्थ नावाचे सरोवर आहे. कल्याण कट्टा (डोक्यावरचे केश काढण्याची  जागा), स्वामी पुष्करिणी मंदिराजवळ सरोवर आहे. वाराह मंदिर आहे. येथे  वाराहाचे प्रकटीकरण  झाले होते असे समजतात. बालाजीच्या मंदिराचा कलश संपूर्ण सुवर्णाचा असून, भारतातील  श्रीमंत  देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथे श्रीराधा कृष्ण मंदिर, शिव, हनुमान, गणेश इ. देवतांची  मंदिरे  आहेत. आकाशगंगा, पापविनाश, वैकुंठ, पांडव, जांबली, गोगार्भ इ. तीर्थे आहेत. येथे  भगवंताची 'श्रीमूर्ती' हि शंख, गदा, पद्मधारी आहे. हि मूर्ती सात फुट उंचीची आहे. दोन बाजूला श्रीदेवी व  भूदेवीच्या मूर्ती आहेत. श्रीरामानुजाचार्यांचे येथे एक पीठ आहे. येथून जवळच तीरुचानुरला पद्मावती देवीचे मंदिर आहे.           










द्वारावती (द्वारका)

द्वारावती (द्वारका) - द्वारकेचे येथून नुसते दर्शन केले, तिला स्पर्श केला तरीही मनुष्याची मोठमोठ्या पापांमधून सुटका होऊन त्याला मुक्ती मिळते. स्वर्ग लोकामध्ये तो जातो, असे स्कंद पुराणात म्हटले आहे. 

               चार धामांपैकी हे एक धाम आणि सात मोक्षपुरीमधील एक असे हे  प्राचीन  क्षेत्र  सौराष्ट्रात  गोमातीच्या तीरावर आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णाची हि  नगरी म्हणून भाविकांच्या मनात हिला  अनन्यसाधारण  महत्वाचे स्थान आहे. महाभारत, वायू, स्कंद, विष्णू, भागवत वगैरे पुराणांमध्ये द्वारकेचे माहात्म्य वर्णिलेले आहे. द्वारावती, द्वारवती, द्वारमती वगैरे नावेही या क्षेत्राची आहेत.




               चतुर्वर्नांना मोक्षद्वारणी सन्ति यत्रेति-म्हणजे जिथे चारही वर्नियांची मोक्षद्वारे उघडी आहेत ती हि द्वारवती तथा द्वारका होय. 

                द्वारकेमध्ये असंख्य मंदिरे आहेत.   त्यातील  द्वारकाधीशाचे  प्रमुख   मंदिर  होय.  श्रीरामानुजांनी  सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे येथील त्याचे सर्व पूजाविधी होत असतात. बलराम, अंबादेवी, श्रीकृषणाच्या  अष्टनायिका , वृद्धेश्वर महादेव यांच्याही येथे मूर्ती आहेत.

                मोंगल आणि ब्रिटीश अमदानीत द्वारकेच्या मंदिरांच्या विध्वंस करण्यात आला होता. नंतर ते  पुन्हा बांधण्यात आले. 


               आद्य शंकराचार्यांनी हिंदुस्थानात चारी भागांत त्यांचा एक एक मठ स्थापन केला. त्यातील  शारदापीठ हे द्वारकाधीशाचे मंदिरानजीक आहे. संत ज्ञानदेव, मध्वाचार्य, रामानुजाचार्य,  वल्लभाचार्य,  नरसिंह मेहता, मीराबाई वगैरे अनेक महात्म्यांनी येथे येऊन द्वारकाधीशाचे दर्शन घेतलेले आहे. 

              गोमती नदी आणि समुद्र यांचा येथे संगम आहे. तेथे संगम नारायणाचे मंदिर आहे. निष्पाप  नावाचे येथे आणखी एक तीर्थ आहे. 







Wednesday 27 April 2011

मथुरा


मथुरा- मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी. त्यामुळे भारतीयांच्या मनात या क्षेत्राविषयी अनन्यसाधारण भक्तीभावना आहे. राजवाडा, उंची हवेल्या यामध्ये भगवंताला जन्म घेता आला असता, पण तेथे त्यांनी तो न घेता येथे तुरुंगात घेतला, आणि त्या तुरुंगभूमीचे रुपांतर झाले तीर्थक्षेत्रात.





           मधुपुरी, मधुशिका, मधुपघ्ना, मधुबन, मधुरा अशी नावेही मथुरेला आहेत. श्रीकृष्ण जन्मभूमी, तसेच त्या नजीकचे गीता मंदिर, द्वारकाधीश मंदिर, वृंदावन, गोवर्धन पर्वत, बाल ध्रुव टेकडी, कालिया नागाला नष्ट केले ते कालियहद, श्रीरंग मंदिर, गोकुळ, महावन नांदगाव, बरसाना वगैरे अनेक क्षेत्रे व घाट या परिसरातील यामुनातटकी आहेत.





           मथुरेचा हा परिसर २६८ कि. मी. चा असून मथुरेच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर ९३ तीर्थक्षेत्रे आहेत. या परिसराला ब्रजमंडळ म्हणतात. त्याशिवाय या प्रदक्षिणा मार्गास काही फाटे फुटले असून तेथे जुरहरा, रेणुका, धोलपुर, सीताकुंद, धरणीधर, वराह, देवल, देवकली, हरगाव, गोल, गोकर्ण ही क्षेत्रे आहेत.
 तसेच या प्रदेशात जैनांचीही शारीपुर, त्रिलोक्पुर, चांदपूर, कम्पिल वगैरे क्षेत्रे आहेत.

            मथुरेहून आग्ऱ्याला रेल्वे व मोटार मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आगऱ्याहून  सुटका हा प्रसंग येथीलच लाल किल्ल्यातील. जगप्रसिद्ध ताजमहाल, फत्तेपुर्सिक्री वगैरे स्थळे येथे आहेत.




































































































































































































































अयोध्या

अयोध्या-भारतीयांच्या जीवनात 'राम' या नावाला किंवा शब्दाला अनन्यसाधारण महत्वाचे स्थान आहे. त्या श्रीरामाचे जन्मग्राम म्हणजे अयोध्या. उत्तरेतील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र. हि पुराणकालीन सात पुर्यांमधील हि एक नगरी आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी आपले रामायण येथे लिहले. विनिता, अयुधा, साकेत, इक्ष्वाकुंची ही भूमी म्हणून इक्ष्वाकुभूमी, रामभूमी अशी काही नावे या नगरीला आहेत.




           शरयू नदी ही येथील तीर्थ. तिच्या तीरावर ऋणमोचन, सहस्त्रधारा, लक्ष्मन, स्वर्गद्वार, गंगामहाल, शिवाला, जटायू, अहल्याबाई, जानकी, राम वगैरे अनेक घात आहेत. हनुमानगड, कनकभवन, दर्शनेश्वर, जन्मस्थान, तुलसी चौथरा, मनिपर्वत, द्तुन्कुंड, सोनखर, सूर्यकुंड, गुप्तारघात, जनकौरा भरताचे आजोळ नंदीग्राम, दशरथतीर्थ, चपैया वगैरे स्थळे या परिसरात आहेत.

           येथील मणिपर्वतावर राजा अशोकाने बौद्ध स्तंभ व स्तूप बांधला. गौतम बुद्ध स्वतः या नगरीत राहत असत.

           जैन तीर्थकर ऋषभदेव यांची ही जन्मभूमी. या परिसरात पाच जैन मंदिरे आहेत. या प्रदेशामध्ये जमदग्नी कुंड, बलरामपुर, देवीपाटन, पिपरावा, कपिलवस्तू, मगहर, कुशीनगर श्रावस्ती आणि गोरखनाथांचे मुख्य तपस्चर्या स्थळ, गोरखपूर ही क्षेत्रे आहेत. गोरखनाथ, श्रीविष्णू, श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीशंकर वगैरे देवतांची येथे मंदिरे आहेत. 



  

Tuesday 26 April 2011

त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर- त्र्यंबकेश्वर हा एकटा नसून तो तेथे ब्रम्हदेव व श्रीविष्णू यांच्या समवेत आहे. या पिंडीवर लहानशी चीर असून तिच्यातून सतत जल पाझरत असते. ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी हे शिवालय आहे.

             श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराभोवती भव्य चिरेबंदी तट आहे. मंदिराची बांधणी श्रीयांत्राकार आहे.





             ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरीचा उगम झाला. पण ती नंतर भूगर्भातून वाहू लागून खाली  त्र्यंबकेश्वरापाशी प्रगट झाली. गौतम ऋषींनी आपल्या कुशाचा बांध घालून तिला अडवून धरले, ते येथील कुशावर्त तीर्थ.

             ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी नाथ पंथातील मंडळींचा प्राचीन त्र्यंबकमाठ आहे. दर बारा वर्षांनी तेथे कुंभ मेळा भरतो. त्यावेळी हिंदुस्थानातून नागपन्थांच्या बाराही शाखांचे जोगी इथे येत असतात.





             गंगाद्वार-कनखल-अहल्यासंगम-गौतमालय-चक्रतीर्थ वगैरे तीर्थे येथे असून गायत्री-इंदेश्वर-रामेश्वर वगैरे देवतांची मंदिरे आहेत.

             महाराष्ट्रातील मोठे संत ज्ञानदेव यांचे थोरले बंधू आणि गुरु संत श्रीनिवृत्तीनाथ येथे शके १२१६ ज्येष्ठ वद्य ११ ला समाधी घेतली. त्यांचे येथे मंदिर आहे.
           





रामेश्वर

रामेश्वर- भारतातील चारीधाम यात्रेतील हे एक धाम द्क्षिन्द्वार. बारा ज्योतीर्लीन्गातील हे एक क्षेत्र. तीर्थयात्रेचा विषय निघाला कि सहजच तोंडातून शब्द बाहेर पडतात काशी-रामेश्वर. वास्तविक काशी उत्तरेत, तर रामेश्वर दक्षिणेत. दोन्ही क्षेत्रांमध्ये शेकडो किलोमीटरचे अंतर. पण काशीची गंगा नेऊन रामेश्वराला स्नान घालायचे आणि रामेश्वर सागरातील सेतू म्हणजे वाळू काशीला नेऊन गंगार्पण करायची हि भारतीयांची प्राचीन काळपासून आजतागायत चालत आलेली पुण्या परंपरा.




         रामेश्वरामध्ये रामतीर्थ, हनुमानतीर्थ, सीतातीर्थ, लक्ष्मनतीर्थ, माधवतीर्थ, नीलतीर्थ वगैरे अठ्ठावीस तीर्थे आहेत.

         रामेश्वर मंदिराभोवती भव्य तट असून एक हजार मीटर लांब व आठशे मीटर रुंद एवढे मोठे हे मंदिर आहे. चार द्वारे त्याला आहेत. प्रत्येक द्वारावर गोपूर आहे. त्यांच्यावर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. रामेश्वराच्या पिंडीसमोर भव्य नंदी असून नजीकच सोन्याच्या पत्र्याने मढविलेला गरुडस्तंभ आहे.





         पार्वती, गणपती, नंदिकेश्वर, श्रीराम, कार्तिकस्वामी वगैरेंची येथे मंदिरे आहेत. रामनाद येथील सेतुवती या राजघराण्यातील वंशजांनी हे मंदिर बांधलेले आहे. दर शुक्रवारी येथे पार्वतीची पालखी निघत असते. बाराही महिने भाविकांची गर्दी असते.





महांकालेश्वर

महांकालेश्वर- अवतरण या मूळ संस्कृत शब्दापासून अवतार हा शब्द निर्माण झाला आहे. अव म्हणजे खाली व तृ म्हणजे उतरणे. शिवाने महान्कालाचा आणि पार्वतीने हरसिद्धीचा अवतार घेतला, ती गोष्ट घडली, ती हि अवतार कथा.





        त्रिपुरासुर मजला होता. ऋषीमुनींना तो त्रास देत होता. त्याचा वध शिवशंकरांनी केला. याचाच अर्थ त्रिपुरासुरावर विजय मिळविला. म्हणून या ठिकाणाचे नाव पडले उज्जयिनी. मध्यप्रदेशात हे क्षेत्र असून बारा ज्योतीर्लीन्गांतील एक आहे. त्याला महांकाल किंवा महांकालेश्वर म्हणतात.



 

        उज्जयीनीचे दुसरे नाव अवंती आहे. अयोध्या-मथुरा येथे सप्त पुर्यांमध्ये अवंती हि नगरी पण आहे.

        देवीच्या एक्कावन्न शक्तिपीठांपैकी हे एक आहे. इथे सतीचा कोपर गळून पडला म्हणून इथे देवीच्या मूर्तीऐवजी कोपराची पूजा करतात.




Sunday 24 April 2011

सोरटीसोमनाथ - बारा जोतीर्लीगापैकी एक आहे. सौराष्टातील सोमनाथ हे आद्य जोतीर्लीग आहे. प्राचीन काळी सर्वत्र समृद्धी होती.  तेव्हा या भागाचे नाव सुराज्य होते. पुढे ते असुरांच्या ताब्यात गेले. मग यादवांनी ते जिंकून घेतले आणि त्यांचे नाव झाले सौराष्ट्र. सोम म्हणजे चंद्र. चंद्राने इथे शिवासाठी तप केले. आणि त्यांना नाथ अश्या नावाने तो हाक मारू लागला. शिव त्याला प्रसन्न झाले तो हा सोमनाथ भक्तीच्या सामर्थ्यावर  शिवाच्या मस्तकावर ज्याला आढळ स्थान प्राप्त झाले तो हा चंद्र. भगवान श्री कृष्णाने आपली अवतार समाप्ती येथे केली म्हणून या क्षेत्राला महत्व आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुढाकाराने मंदिर बांधण्यात आले असून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी येथील सोमनाथाची प्रतिष्ठापना केली आहे. साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले एक सोमनाथाचे मंदिरही येथे आहे. एका व्यधाने सोडलेला बाण लागून श्रीकृष्णाची  अवतार samapti  झाली. येथे हिरण्य नदी आहे. श्रीकृष्ण आणि श्रीमाध्भगवत्गीता मंदिर आहे.
 त्रिवेणी संगम आहे. हिरण्य, सरस्वती आणि कपिला या नद्या समुद्राला मिळतात तेथे संगमेश्वरचे आणि सूर्याचे मंदिर आहे.








Saturday 23 April 2011

केदारनाथ


केदारनाथ -बारा ज्योतीर्लीन्गातील एक तीर्थक्षेत्र. समुद्रसपाटीपासून सुमारे १९,००० किलोमीटर उंचीवर हिमालयात हे शिवालय आहे. सत्य उगामध्ये केदार्नामक  राजाने  इथे घोर शिवशंकराची तपस्चर्या केली. त्यावरून या क्षेत्राला केदार नाव पडले. केदारनाथला पाच नद्यांचा संगम आहे. मंदाकिनी  सरस्वती, शिर्गंगा, स्वर्गाद्वारी आणि महोदधी या पाच नद्यामिळून एक प्रवाह वाहतो तो म्हणजे मंदाकिनी. 
 
इथे प्रचंड बर्फ वृष्टी होत असते. केदार हे छोटेसे गाव बर्फात बुडले जाते. तेथील केदारनाथाचे  मंदिर आणि घरे बर्फमय होतात. दिवाळीच्या पाडव्याला केदारनाथाचे मंदिर बंद केले जाते. ते नंतर अक्षयतृतीयेला उघडले जाते. मंदिर सहा महिने बंद असते. तेव्हा तेथील उत्सव मूर्ती उखिमठ येथे नेण्यात येते. केदारनाथाच्या खाली बद्रीनाथाकडे जातांना हे उखिमठ लागते. पांडवांच्या तपस्चर्येने शिवशंकर  प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन दिले. म्हशीच्या पाठीचा भाग केदार येथे जमिनीवर राहिला तेच म्हणजे केदारनाथ स्वयंभू  लिंग त्यामुळे हे लिंग म्हशीच्या पाठीसारखे आहे. शिवलिंगाची पूजा केल्याने पांडव पापमुक्त झाले. तेथे मग पांडवांनी मंदिर बांधले. पुढे आद्य शंकराचार्यांनी त्याचा जीर्नोद्दार केला देवळावर सुवर्न् कलश आहे. तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आहे. देवळामध्ये पांडव आणि द्रोपदी यांच्या प्रतिमा आहे. येथे शिवलिंगाला पाण्याने स्नान घालत नाही त्याला तूप चोळण्याची प्रथा आहे. मंदिराच्या भोवती आठ कुंडे आहेत. येथून जवळच भिराव्झाप नावाचा हिमालयाचा कडा आहे. तेथून उडी टाकून देह समर्पण केला. तर आत्महत्येचे पाप लागत नाही असे महात्यंम आहे. स्वर्गारोहण नावाचा इथे एक मार्ग आहे. पांडव याच मार्गाने देह समाप्तीच्या वेळी गेले. स्वर्ग्रोहण येथे कुंड असून ते तीर्थ आहे. 





























































































































































































































































































जाग्ग्नाठ्पुरी







जाग्ग्नाठ्पुरी:- पूर्व भारतातील सर्वात महत्वाचे तीर्थे क्षेत्र म्हणजे  जाग्ग्नाठ्पुरी. चारी धामापैकी एक धाम . सागराचा संन्निधात वसलेले ओरिसातील हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील मुख मंदिरात श्रीकृष्ण ,सुभद्रा , आणि बलराम यांचा लाकडी ओद्क्यचा हाथ पाय नसलेल्य मूर्तआहे .त मागील कथा अशी आहे कि श्री कृष्णाचा पत्त्राना आकडा द्वारके madhe रोहिणीचा घरी गळा v tani तिला श्री कृष्ण gopi कथा साग्नास सागितले . parantu तिथे सुभद्रा होती. तिला हि कट सुम्जुन्ये म्हणून रोहिणीने सुभद्राला दारापाशी उभें केले v आत कोणालाही यू देऊ नकोस असे सागितले v दर लाऊन घेतले तव्धात तिथें देवर्षी नारद आले v tani रोहोनोला हक मारली. ती बाहेर आली पण तव्धात श्री krushna, subhdra आणि बलराम अदृश्य झाले v orisat nilachal prvtavar gale v tahe aka grib bhktakde rahu  lagle. yathe subhdra आणि बलराम yancha hath pai naslela chandni lakdi murte ahet. aashadh mdhhe ya devanche aathe divas yatra tala jagnathache yatra भरते तला जाग्नाथाचे रथयात्रा म्हणतात. जाग्नाठ्पुरीचा आकार शान्खासारखा असलाने याला शंख स्क्त्र हि म्हणतात मार्कंडेय सरवर , कृष्ण वाट, बलराम साम्मुद्र लोकनाथ हुनुमान बडी, बनपुर, महान्द्र्गिरी, वैगेरे क्षेत्र आहे.





























































 

Saturday 2 April 2011

काशी

काशी- कांची हे शिवतीर्थ आणि विष्णुतीर्थहि आहे. येथील स्टेशनाचे नाव कांजीवरम असले तरी या शहराचे नाव कांचीपुरम आहे. मद्रासपासून सुमारे १२ कि. मी. वर हे शहर आहे. शिवकांची व विष्णुकांची असे या नगरीचे दोन भाग आहेत.
 
        अयोध्या, मथुरा, द्वारका, हरिद्वार, काशी, उज्जैन आणि 'कांची' या मोक्ष देणाऱ्या सप्तपुर्या     आहेत. येथे सतीचे नख गळून पडले म्हणून या क्षेत्राला शक्तीपीठहि मानतात.  
             
 
 
 
                  नेत्रद्वय महेशस्य काशीकांचीपुरीद्व्यम !
         म्हणजे काशी आणि कांची हे शिवाचे नेत्र आहेत, असे ब्रम्हांडपुराणात म्हटले आहे.   
 
         येथील एकम्बरनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या महाद्वारावरील गोपूर ५८ मीटर उंच आहे आणि येथील सभामंडपाला एक हजार खांब आहेत. येथील शिवलिंग पृथ्वी-तत्वरूप मानतात. शिवकांचीमधील कामाक्षीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. गावात शंकराचार्यांचेहि मंदिर आहे.
 
 
 
 
 
         विष्णुकांचीला वरदराजाचे मंदिर प्रसिद्ध आहे. या कांचीमध्ये १८ विष्णूस्थळे, १०८ शिवस्थळे आणि-१ गणेशस्थळे आहेत. येथील कैलासाचे मंदिर इ. स. ६७४ मध्ये पल्लवराजांनी बांधलेले आहे. 
 
         येथील पिप्पलैथम हे प्राचीन जैन मंदिरही प्रसिद्ध आहे. हि पल्लवांची राजधानी होती. दक्षिणेतील प्रत्येक संत, तसेच पंडित, साहित्यिक यांनी या ठिकाणी वास्तव्य केले.  त्यामुळे हि विद्वानांची नगरी म्हणून मानण्यात येते. बौद्ध व जैन मुनींनीही येथे वास्तव्य केले. येथे विद्यापीठ होते.
 
         सर्वतीर्थ, शिवगंगा, पुष्करिणी, कोटीतीर्थ वगैरे अनेक सरोवर येथे आहे.
 
 
 
 

कन्याकुमारी


कन्याकुमारी- भारताच्या दक्षिणेकडील तीर्थस्थान. पश्चिमसागर, दक्षिणसागर, व बंगालचा उपसागर या  तीनही सागराचा संगम येथे आहे. एकावेळी सूर्यास्त व चंद्रोदय पहावयाचे ठिकाण. ५१ शक्तीपीठापैकी हे देवीचे विशाल मंदिर आहे. 




              त्रिवेणी सागरसंगम स्थानाचे महात्म्य येथे आहे. येथून पुढे समुद्रात विवेकानंद स्मारक आहे. तेथे तीन दिवस विवेकानंदांनी तप केले होते. तेथे त्यांना दिव्या साक्षात्कार झाला होता. तेव्हा देवीचे दर्शन स्वामीजींना झाले होते. त्याचे चरणचिन्ह आजही तेथे आहे. येथे विवेकानंद मंडप,  ध्यानमंडप, श्रीपाद मंडप अशी स्थाने आहेत. कन्याकुमारीहून जवळच शुचीन्द्रम  म्हणून स्थान आहे. 




              शुचीन्द्रम येथे शंकर कन्याकुमारीशी विवाह करण्याकरिता आले होते. ते हे स्थान. येथे शिवलिंग रूपातील त्रिमूर्ती असून त्यावर नागफण्यांची छत्री आहे. त्यामध्ये चंद्राचा सोळा कळा  दाखविल्या जातात. येथेही स्तंभावर स्वर उमटतात. हे स्वर तंबोरा, सतार, जलतरंगचे  आहेत.  



              येथून पुढे नागर कोइल येथे नागेश्वराचे मंदिर आहे. तीरुविहार येथे शेषशायी भगवंताची  मूर्ती आहे. त्यानंतर पपनाराम येथे नीलकंठ, नियातेकरा येथे श्रीकृष्ण, कुमारकोइल येथे कार्तिक स्वामी यांची मंदिरे आहेत. जवळच त्रिवेंद्रम शहर आहे. तेथे पद्मनाभ भगवंताचे मंदिर असून मुळचे नाव तिरुअनन्तपुरम असे आहे. तेथे मत्स्यतीर्थ, कोलत्तूर, व जनार्दन हि तीर्थस्थाने आहेत.