Thursday 28 April 2011

द्वारावती (द्वारका)

द्वारावती (द्वारका) - द्वारकेचे येथून नुसते दर्शन केले, तिला स्पर्श केला तरीही मनुष्याची मोठमोठ्या पापांमधून सुटका होऊन त्याला मुक्ती मिळते. स्वर्ग लोकामध्ये तो जातो, असे स्कंद पुराणात म्हटले आहे. 

               चार धामांपैकी हे एक धाम आणि सात मोक्षपुरीमधील एक असे हे  प्राचीन  क्षेत्र  सौराष्ट्रात  गोमातीच्या तीरावर आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णाची हि  नगरी म्हणून भाविकांच्या मनात हिला  अनन्यसाधारण  महत्वाचे स्थान आहे. महाभारत, वायू, स्कंद, विष्णू, भागवत वगैरे पुराणांमध्ये द्वारकेचे माहात्म्य वर्णिलेले आहे. द्वारावती, द्वारवती, द्वारमती वगैरे नावेही या क्षेत्राची आहेत.




               चतुर्वर्नांना मोक्षद्वारणी सन्ति यत्रेति-म्हणजे जिथे चारही वर्नियांची मोक्षद्वारे उघडी आहेत ती हि द्वारवती तथा द्वारका होय. 

                द्वारकेमध्ये असंख्य मंदिरे आहेत.   त्यातील  द्वारकाधीशाचे  प्रमुख   मंदिर  होय.  श्रीरामानुजांनी  सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे येथील त्याचे सर्व पूजाविधी होत असतात. बलराम, अंबादेवी, श्रीकृषणाच्या  अष्टनायिका , वृद्धेश्वर महादेव यांच्याही येथे मूर्ती आहेत.

                मोंगल आणि ब्रिटीश अमदानीत द्वारकेच्या मंदिरांच्या विध्वंस करण्यात आला होता. नंतर ते  पुन्हा बांधण्यात आले. 


               आद्य शंकराचार्यांनी हिंदुस्थानात चारी भागांत त्यांचा एक एक मठ स्थापन केला. त्यातील  शारदापीठ हे द्वारकाधीशाचे मंदिरानजीक आहे. संत ज्ञानदेव, मध्वाचार्य, रामानुजाचार्य,  वल्लभाचार्य,  नरसिंह मेहता, मीराबाई वगैरे अनेक महात्म्यांनी येथे येऊन द्वारकाधीशाचे दर्शन घेतलेले आहे. 

              गोमती नदी आणि समुद्र यांचा येथे संगम आहे. तेथे संगम नारायणाचे मंदिर आहे. निष्पाप  नावाचे येथे आणखी एक तीर्थ आहे. 







No comments:

Post a Comment